By
Kiran Pendse
गणेश स्थापना
गणेश स्थापना - प्राणप्रतिष्ठा
नमस्कार,
आपल्या गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापनेसाठी शहरांमध्ये गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. आपल्या गणेशाची पूजा विधिवत व्हावी असं आपल्याला वाटतं. म्हणूनच मी स्वतः म्हणजे श्री. किरण पेंडसे गुरुजी आपल्यासाठी ऑनलाइन पूजा सांगणार आहे. गेली तीन वर्ष हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे सुरू आहे. ऑनलाइन पूजा आपण कशाप्रकारे करतो हे समजून घेऊया.
- बांधिलकी शुल्क रु. 501 भरल्यानंतर आपल्याला पूजेच्या व्हाट्सअप ग्रुप ला ऍड केले जाते. आपला सर्व संवाद आणि सूचना ग्रुप वर मिळतात.
- गुगल मीट च्या आधारे मी स्वतः लाईव्ह पूजा सांगतो.
- सर्वांना सोबत घेऊन पूजा करताना उत्सव साजरा केल्याचे समाधान मिळते.
- अत्यंत सुस्पष्ट सुसंवादातून पूजा संपन्न होते. पूजेच्या तयारीसाठी चार दिवस आधी ग्रुप वरती यादी दिली जाते.
- पूजेमध्ये वेळेची गैरसोय होऊ नये म्हणून पूजेच्या आदल्या दिवशी तयारीचा आढावा घेतला जातो.
- आपल्याला गणपती समजून घेऊन पूजा करायची आहे त्यामुळे तयारीचा आढावा घेताना गणेश समजावून सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो.
- आपल्याला गणपती देवता समजली तरच खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा आपल्यावर कृपा करेल.
- खाली दिलेले JOIN FOR ONLINE PUJA बटण वापरून आपण ग्रुप जॉईन करू शकता.
- पूजा संपन्न झाल्यानंतर ऐच्छिक दक्षिणा द्यायची आहे. आपल्या बाप्पाची पूजा लगेचच बुक करा आणि आपल्या प्रियजनांना सुद्धा सांगा.
गणपती बाप्पा मोरया !
धन्यवाद !


