गोसेवा

नमस्कार !! 
गाईचे महत्व आपण सगळे जण जाणतो. गाय आपल्याला पूजनिय आहे.
गावो विश्वस्य मातर: वेदांनी म्हटलंय. गोप्रदानाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. गाय म्हणजे आपली भारतीय वंशाची जिच्या पाठीवरती वशिंड आहे अशी गाय पूजनीय आहे. आपण गोसेवा म्हणून अनेक वेळा गाईला चारापाणी देतो किंवा एखाद्या गोशाळेला आर्थिक मदत करतो की ज्यामुळे आपल्याला गोसेवा केल्याचं पुण्य मिळेल. हे आवश्यक आहेच, पण यापेक्षा थोडा वेगळा विचार करून गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यातून आर्थिक लाभही व्हावा असा उद्देश ठेवून आपण गो उत्पादनांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करीत आहोत.
आपल्या घरी गाय प्रत्यक्ष सांभाळणे आपल्याला या काळामध्ये सहज शक्य नाही म्हणूनच आपण दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त गो उत्पादने वापरून एक प्रकारे गोसेवा करू शकतो.
गाईचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी
गाय नक्की आपल्याला काय देते ते पाहूया –


गाय पंचमहाभूतांचा योग्य विनियोग करून आपल्याला मुल्यवर्धन (value addition) करून परत देते. 


म्हणून गाय आपल्याला पूजनिय आहे.
ही उत्पादने 100% खात्रीची भारतीय वंशाची स्थानिक देशी प्रजाती कोकण कपिला या गाईच्या दूध, दही, ताक, तूप, गोमूत्र, गोमय इत्यादींपासून बनलेली आहेत.


यामध्ये आपण फेस क्रीम, औषधे, दंतमंजन, केशतेल, शांपू ,गुलाबजल, वास्तुशुद्धी धूपकप, गोनाईल, अशी अनेक उत्पादने दररोजच्या वापरासाठी बनवली आहेत.
ही उत्पादने का वापरावी असा प्रश्न मनात येऊ शकतो तर ही उत्पादने बनवण्यासाठी आवश्यक दूध गोमय गोमूत्र इत्यादी कच्चामाल आपण शुद्ध देशी गाई सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून विकत घेतो त्यानंतर प्रक्रिया करून ही उत्पादने बनतात.


म्हणजेच अशा प्रकारे आपण गाई सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त गो वंशाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देतो.
या शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. एवढेच नाही तर गाय या विषयी आपण अनेक व्याख्याने प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो.
दूध न देणाऱ्या भाकड गाई हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो परंतु अग्निहोत्र तसेच होम हवनासाठी आवश्यक शुद्ध गोमयाच्या शेण्या बनवून, धूपकप बनवून आपण अशा भाकड गाईंपासून सुद्धा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ करून देतो.


या सगळ्याचा विचार करता आपण ही उत्पादने वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तर आपण एक प्रकारे गाय सांभाळल्यासारखीच आहे. 

गोमातेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी हा video नक्की पहा. वेबसाईट वर video galary मध्येही पाहायला मिळेल.

https://youtu.be/ebt_F2M_hPc?si=efTnEI-0mFovV2sV


काही उत्पादने खाली दिली आहेत, तसेच उजव्या कोपऱ्यात खाली व्हाट्सअप संपर्कासाठी बटन दिले आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि  आपली ऑर्डर आजच नोंदवून गोसेवा व्रतामध्ये सहभागी व्हा.