श्रीराम यज्ञ
श्रीराम यज्ञ
जो हिंदू आहे आणि रामभक्त आहे तो प्रत्येकजण या मध्ये सहभागी होऊ शकतो. प्रत्यक्ष हवानात सर्वांना सहभागी करून घेणारा यज्ञ आहे.
माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे |
हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे ||
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे प्रभू श्रीराम हे प्रत्येकाला जवळचे; किंबहुना माझा राम अस वाटायला हव. एकदा आपण रामरायाला आपला सखा म्हणून पाहायला शिकलो कि मग आपण रामरूप होऊन जातो. महाराज सांगतात रामापाशी अनन्य वागावे, पण त्यासाठी आपणही रामरायाच काहीतरी देण लागतो. रामरायाची भक्ती आपल्या हातून घडावी आपल्या मनामध्ये राम भाव जागृत व्हावा त्याच प्रमाणे धर्माविषयी जागरुकता निर्माण व्हायची असेल तर यज्ञासारखे दुसरे साधन नाही. म्हणूनच आपण सर्वांकडून श्रीराम यज्ञ करून घेतो. त्यामध्ये सहभाग हा फक्त लांब बसून बघणे एवढाच मर्यादित नाही, तर प्रत्यक्ष हवानात सर्वांना सहभागी करून घेणारा यज्ञ आहे. जो हिंदू आहे आणि रामभक्त आहे तो प्रत्येकजण या मध्ये सहभागी होऊ शकतो. आम्ही आपल्या पर्यंत येऊन अत्यंत आटोपशीर आणि नियोजनबद्ध कार्यक्रम करतो तोही अगदी आपल्या ऐच्छिक समर्पणामध्ये कारण हि धर्माची सेवा म्हणून आम्ही करतो.
अयोध्येला राम मंदिरात रामललांची स्थापना २२ जानेवारी २०२४ रोजी झाली त्यानिमित्ताने जानेवारी २०२४ मध्ये आपण हि संकल्पना मांडली १३ श्रीराम यज्ञांचा संकल्प केला. श्रीरामांच्या कृपेने आणि सर्व रामभक्तांच्या सहाय्याने २५ यज्ञ पूर्ण झाले. या यज्ञांमुळे समाजात मोठ्या प्रमाणावर उत्साह निर्माण झाला आणि हिंदू धर्माच प्रखर तेज पाहायला मिळालं. असे यज्ञ आयोजित करून आपण आपली संस्कृती टिकवून ठेवू शकतो आणि धर्मावरील आक्रमणाविषयी जागृती निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास वाढला. दरवर्षी असे श्रीराम यज्ञ आपण आयोजित करावे आणि रामकार्य आपल्या हातून घडावे म्हणून या वर्षीसुद्धा जानेवारी महिन्यात मंदिराचा प्रथम वर्धापन दिन साजरा करत आहोत. १ जानेवारी पासून ३१ जानेवारी २०२५ या काळात हे श्रीराम यज्ञ ठिकठिकाणी आयोजित केले जातील.
आपण सर्वजण या यज्ञामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या प्रियजनांना नातेवाईक मित्र मंडळी यांनाहि या मध्ये सहभागी करून घ्या.
प्रभू श्रीरामांची सेवा ही समाज जागृती आणि धर्मरक्षणातून केली तर श्रीरामांना नक्कीच आवडेल आणि आपल्यावर कृपा करतील.
जय श्रीराम !!


