११ शनिवार संस्कार वर्ग
संस्कार वर्ग - श्रीराम उपासना
लहान मुलांसाठी श्लोक, विविध देवतांची स्तोत्रे, रामायण महाभारतातील गोष्टी, शुभंकरोती, मनाचे श्लोक, असे विषय घेऊन मुलांच्या मनात संस्कृतीविषयी धर्माविषयी गौरव भावना निर्माण करणे. कंटाळवाणे न करता रंजक पद्धतीने मुलांच्या मनावर संस्कार घडविणे हा उद्देश आहे.
आपल्या ऋषी मुनी यांची नावं, त्यांची माहिती, त्यांचे ग्रंथ माहिती नसतात; ही माहिती इथे सांगणार आहे. सणांच महत्व, देवता समजवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे. धर्म शिक्षण देणं हि तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे.
विविध शहरांमध्ये मंदिरांच्या सहाय्याने हा उपक्रम आम्ही करतो. मंदिरांनी फक्त जागा बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी लाईट आणि उपलब्ध असल्यास ध्वनी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. कोणतेही अर्थार्जन व्हावे असा उद्देश नाही. विनाशुल्क आयोजन केले जाते.
आजपर्यंत २५० हून अधिक मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला आहे.
दर मंगळवार श्रीराम उपासना स्वान हेरीटेज जालगाव
प्रत्येक वर्गाच्यावेळी कोणी प्रसाद सुद्धा उपलब्ध करतात.
संस्कार वर्गाविषयी अधिक माहिती –
🚩 ११ शनिवार श्रीराम उपासना
यामध्ये लहान मुलांना हिंदू धर्माचं शिक्षण मिळावं मुलांना श्लोक, स्तोत्रे, गोष्टी, भजनं म्हणता यावीत म्हणून शिकवणार आहे.
आपल्या ज्ञान परंपरेविषयी गौरव भावना निर्माण व्हावी आणि आपली मुले संस्कारी व्हावीत म्हणून हा प्रयत्न आहे. पालकांनी केलेल्या आग्रहास्तव या नियमित वर्गाचे आयोजन केले आहे.
मी सर्व पालकांना आवाहन करतो की आपल्या पाल्याला घेऊन आपणही या वर्गासाठी अवश्य यावे.
यासाठी वर्गांसाठी वयाचे बंधन नाही.
आपल्या पाल्याला नक्कीच नवीन शिकण्यासारखं मिळेल. रामरक्षा स्तोत्र शिकवणार त्याचा अर्थसुद्धा सांगणार आहे.मुलांनी आत्मविश्वास आणि संस्कार मिळवण्यासाठी अशा वर्गाला येणं आवश्यक आहे.
या वर्गाच्या माध्यमातून वर्गाला नियमित येणाऱ्या मुलांकडून काही कलाकृती निर्माण व्हाव्या यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्ताने राम कृष्णाच्या गोष्टी घराघरात मुलांपर्यंत पोहोचतील.
वर्गांचे व्हिडीओ videor gallary मध्ये उपलब्ध आहेत.
♦ आपण आपल्या पाल्याला सोडायला व न्यायला यायचे आहे. आपणही वर्गासाठी येणे अपेक्षित आहे. सर्वांसाठी धर्मशिक्षण हा महत्वाचा भाग यामध्ये आहे.
श्री. किरण प्रकाश पेंडसे गुरुजी
9765738748


