श्री. किरण प्रकाश पेंडसे गुरुजी
भारत देशालाच नव्हे तर जगाला आदर्श असणारी अनेक व्यक्तिमत्त्व दापोली तालुक्याने घडवली. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पा. वा. काणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रँग्लर परांजपे, अशी अनेक आदर्श व्यक्तिमत्वे दापोली मध्ये घडली अशा कोकणातील मिनी महाबळेश्र्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात पाच पिढ्यांहून अधिक काळ पौरोहित्य व्यवसायात असणारे कुटुंब म्हणजे पेंडसे गुरुजी.
वेदशास्त्र संपन्न ज्योतिष पारंगत अशा पिढीजात पौरोहित्य व्यवसाय असणाऱ्या कुळामध्ये माझा म्हणजे श्री.किरण प्रकाश पेंडसे गुरुजी यांचा जन्म झाला. माझे वडील श्री प्रकाश पेंडसे यांनी मागील 40 हून अधिक वर्ष श्रीलक्ष्मीनारायण देवस्थान येथे नित्य पूजेचे व्रत स्वीकारले आहे आणि पुढेही अव्याहत सुरू राहणार आहे.
श्री. किरण गुरुजी यांचे M.Sc. पर्यंतचे सर्व लौकिक शिक्षण दापोली येथे झाले. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात आवड असल्यामुळे B.Ed. सुद्धा पूर्ण केले. रसायनशास्त्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करताना, आपल्या पौरोहित्याच्या व्यवसायामध्ये या ज्ञानाचा उपयोग आपण धार्मिक कृतीतील विज्ञान समजून घेऊन ते समाजा पर्यंत पोहोचवावे असा उद्देश होता.
पौरोहित्याचे याज्ञिक आणि पारंपारिक रूढी परंपरांचे शिक्षण वडिलांजवळ पूर्ण करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत लौकिक शिक्षण पूर्ण केले. ज्योतिष शास्त्राचे परिपूर्ण ज्ञान मिळावे या हेतूने ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था पुणे येथे फलादेश आणि गणित यांच्या ज्योतिष प्रवीण ज्योतिष प्राज्ञ या परीक्षा पूर्ण केल्या. शिक्षण संपल्यानंतर सहा वर्षे विज्ञान महाविद्यालयामध्ये अध्यापनाची नोकरी केली. परंतु ज्योतिष शास्त्राची आवड, वास्तुशास्त्राचा ध्यास आणि पौरोहित्य व्यवसायाचा घरचा प्रचंड व्याप असल्यामुळे नोकरी सोडून पूर्णवेळ याज्ञिकी सुरू केली. वास्तुरविराज संस्थेमध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. सातत्याने नवीन काहीतरी शिकण्याचा स्वभाव असल्यामुळे आणि विज्ञानाचा साधक असल्यामुळे पौरोहित्य करत असताना त्याच्या सर्व संलग्न सेवा आपल्याला देता यायला हव्यात यासाठी प्राध्यापक रवी वैद्य यांच्याकडे डाऊझिंग आणि जिओपॅथिक स्ट्रेस याविषयी शिक्षण पूर्ण करून प्रिन्सिपल डाऊझर ही पदवी संपादन केली.
आपल्याकडे येणारे अनेक जातक हे त्यांच्या अडचणीने गांजलेले त्रस्त झालेले असतात. काही वेळा मनमोकळेपणाने आपल्याशी बोलू शकत नाही त्यामुळे समोरच्या मनातील गुज ओळखण्याची कला आत्मसात करण्यासाठी पुणे येथील सौ.चित्रा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेलिपथी म्हणजेच शब्दाविना संवाद साधण्याची कला आत्मसात केली. या सर्व प्रवासाचा विचार करता श्री. किरण पेंडसे गुरुजी यांनी केवळ एकाच गोष्टीत कार्यरत न राहता समाजाला आवश्यक असणाऱ्या यज्ञिकी – पौरोहित्यासह वास्तुशास्त्र, कुंडली-ज्योतिष, डाऊझिंग, टेलिपॅथिक कम्युनिकेटर अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. मिळवलेले ज्ञान फक्त पैसे मिळवण्यासाठी आणि धार्मिक कर्मकांडांपुरतेच मर्यादित न ठेवता, समाजातील सर्व स्तरातील लोकांना वेळोवेळी, योग्य व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करुन जनमानसात श्रद्धेचे स्थान निर्माण करत आहोत. तसेच समाजातील धर्म विषयक गैरसमज दूर करून योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून लोकांना वेळोवेळी शिक्षित करण्याचे कार्य सुरू असते. ज्ञानप्रतिष्ठा समाजामध्ये ज्ञानाची पातळी खालावलेली दिसते यासाठी कोणीतरी काम करणे अपेक्षित आहे. शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठा समाजामध्ये व्हावी यासाठी भारतीय संस्कृती सण परंपरा यांचा अभ्यास करून त्यामागचे तत्त्वज्ञान आणि त्याचा अंगीकार करण्यासाठी सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे.
अशाप्रकारे कार्य सुरू असतानाच आपल्याला अधिकाराने बोलता यावे यासाठी स्वतःचा अभ्यास साधना असणे आवश्यक वाटते यासाठी आमचे गुरुजी हरिदास यशवंत यांच्याकडे उपनिषदे वेदवेदांग यावरील शांकरभाष्य तसेच विष्णुसहस्रनाम, श्रीदत्तगुरु, श्रीगणेश, प्रभूश्रीराम, श्रीकृष्ण, भगवद्गीता यांचे शिक्षण सुरू आहे. समाजापर्यंत भारतीय ज्ञान आपण नाही तर कोण पोहोचवणार ? ही ज्ञान परंपरा पुढे चालवण्याची आपली जबाबदारी आहे. गावागावांमध्ये असणारा समाज अजूनही राम-कृष्णाच्या चरित्राविषयी दुर्दैवाने अनभिज्ञ आहे. फक्त ग्रामीणच नाही तर सुशिक्षित समाज तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे आपल्या ज्ञानपरंपरेपासून दूर जाताना दिसतो आहे या सर्वांसाठी आपण व्याख्यानमाला, कार्यशाळा यांचे आयोजन करतो. हे सर्व करताना यामधून कोणत्याही प्रकारे अर्थार्जन व्हावे असा उद्देश नाही.
समाजामध्ये शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठापना करणे आणि त्यासाठी अविरत प्रयत्न करणे हेच आपले व्रत आहे. हे सर्व व्यावसायिक स्वरूपाचे काम करत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने कर्तव्य आणि भावना आवश्यक असतात. हिंदू जागरण, एकत्रीकरण आणि सबलीकरण याचा विचार कायमस्वरूपी मनामध्ये असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने २२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या रामललांच्या अयोध्या मंदिरातील स्थापनेच्या निमित्ताने समाजामध्ये जाऊन श्रीराम यज्ञ करण्याची संकल्पना मांडली. १३ यज्ञांचा संकल्प असताना श्रीराम कृपेने २५ यज्ञ पूर्ण झाले. दरवर्षी या निमित्ताने श्रीराम यज्ञ सुरू राहतील. आबालवृद्ध स्त्री पुरुष जो हिंदू तो प्रत्येक व्यक्ती यज्ञामध्ये आहूती देण्यासाठी सहभागी होतात यामधून प्रचंड प्रमाणात हिंदू ऐक्याची भावना समाजामध्ये निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत. असे अनेक उपक्रम श्री. किरण पेंडसे गुरुजी राबवतात. यामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य तन – मन-धन पूर्वक अपेक्षित आहे. आपण अनेक चांगली कर्म करत असतो परंतु एका भेटीमध्ये किंवा थोड्या वेळामध्ये आपले कार्य समजावून येत नाही म्हणून ही वेबसाईट ची योजना.
आमच्या विषयी अधिक जाणून घ्या आणि अवश्य संपर्क करा.
संपर्क
9765738748
sankalp@pendseguruji.com
Certifications
What people say
"डाऊझिंगच्या माध्यमातून गुरुजींनी मला माझ्या आरोग्याच्या समस्यांची कारणे समजून घेण्यास मदत केली आहे. आता मी योग्य उपचार आणि उपाययोजना करून माझे आरोग्य सुधारू शकतो."
Ashish S
"गुरुजींचा पत्रिकेचा अभ्यास पाहून मी खूपच प्रभावित झालो. गुरुजींनी माझ्या जीवनातील अनेक प्रश्न सोडवण्यास मदत केली आहे. माझ्या करिअरच्या निवडीपासून ते माझ्या वैयक्तिक नातेसंबंधांपर्यंत, कुंडलीने मला मार्गदर्शन केले आहे. या अभ्यासामुळे मला माझ्या आयुष्याचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्याची शक्ती मिळाली आहे."
Shriyash
"I was struggling with anxiety and felt stuck in a rut. Vastu helped me create a more harmonious and peaceful environment. The changes, though subtle, have had a profound impact on my mental clarity and overall sense of well-being."
Pramay


