पूजा, होम हवन, षोडशसंस्कार

यज्जाग्रतो दूरमुदैति दैवं तदु सुप्तस्य तथैवैति I
दुरंगमं ज्योतिषां ज्योतीरेकं तन्मे मन शिवसंकल्पमस्तु II
माझे मन कल्याणकारी संकल्प करणारे होवो. अशी प्रार्थना आपण करत आहोत.

मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण चतुष्टयावर संस्कार झाले तरच आपल्याला सुख, समृद्धी, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होऊ शकते.

आपल्या धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडातरी वेळ काढून आपण धार्मिक कृत्ये केली पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला उर्जा प्राप्त होईल, मानसिक तणावातून मुक्ती मिळेल आणि सर्व टेन्शन ताणताणाव बाजूला होऊन शांत झोप लागेल. यासाठी पेंडसे गुरुजी तुम्हाला मदत करू शकतात. अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम, वेळेचे भान आणि यजमानांचे समाधान.  

अखंड भारतामध्ये कुठेही धार्मिक कार्यक्रमासाठी उच्चविद्याविभूषित गुरुजींसह आणि सर्व आवश्यक साहित्यासह आम्ही आपल्याला सेवा पुरवू शकतो. भारताबाहेरसुद्धा अनेक देशांमध्ये जे आपले भारतीय राहतात त्यांनाही आपण online पद्धतीने पूजा-कथा सांगतो.

आपली इच्छा असते काहीतरी धार्मिक कृत्य करण्याची पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आपला विचार तेथेच विरतो, मग असा विचार मनात आला कि लगेच आमच्याशी संपर्क करा.   

आपण ज्या कृती करतो, जे मंत्र म्हणतो, त्याचा अर्थ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यजमान कुटुंबियांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याचे पूजन करायचे ति देवताच कळली नाही तर आपल्याला अपेक्षित यश किंवा मानसिक समाधान कसे मिळणार बर? 

फक्त पैसे मिळवणे हा एकमेव उद्देश या व्यवसायाचा नाही,
तर समाजात ज्ञान, कर्म, भक्तीची प्रतिष्ठापना करणे आणि सुयोग्य पद्धतीने कर्म करून समाधान मिळवणे हेच उद्दिष्ट आहे.

कर्माच्या संकल्पाला फार महत्व आहे म्हणूनच आपण म्हणतो,
ते माझे मन कल्याणकारी विचार करणारे होवो.
आम्ही देत असलेल्या सर्व सेवा

भूमीपूजन-गृहप्रवेश-वास्तुशांती

    • भूमीपूजन, कोनशीला स्थापन प्लॉटमध्ये शुभ स्पंदने निर्माण होण्यासाठी
    • वास्तूमध्ये आनंद-समृद्धी-संपत्ती-संतती वृद्धी होण्यासाठी
    • सर्व धार्मिक कृतीविषयी संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन

यज्ञ – याग

    • विशेष इच्छा आणि शुभ मनोरथ साध्य करण्यासाठी
    • विवाह – संसार – संतती – आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी
    • सकारात्मक ऊर्जा, मनःशांती आणि आराध्य देवतेचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी
    • चंडी याग
    • रुद्र याग
    • गणेश याग
    • विष्णु याग

विवाह सोहळा / Destination Wedding

    • साखरपुडा – देवदेवक – नवग्रह होम
    • लग्नविधी – विवाहहोम- सप्तपदी
    • कन्यादान – लक्ष्मीपूजन
    • आपल्या कुलाचाराप्रमाणे – परंपरेनुसार आवश्यक धार्मिक विधी
    • सर्व विधींची परिपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन

व्रतबंध-मौंजीबंधन

    • ग्रहमख-देवदेवक
    • मातृभोजन
    • गायत्री-यज्ञोपवीत संस्कार
    • सर्व विधींची परिपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन

व्यावसाईक ऑफिस उद्घाटन समारंभ

    • स्वस्तिवाचन
    • गणेश पूजन
    • पुण्याहवाचन कलश पूजा
    • लक्ष्मीकुबेर पूजन
    • आरती – प्रार्थना – प्रसाद

जन्मदिन पूजा (BIRTHDAY CELEBRATION)

    • स्वस्तिवाचन – महासंकल्प
    • गणेश / मार्कंडेय / सप्तचिरंजीव पूजन
    • पुण्याहवाचन – ग्रहशांती जप आणि हवन
    • पूर्णाहुती – आरती – प्रसाद

सदगुरु पूजन

    • गणेशपूजा – संकल्प
    • सद्गुरूंची षोडशोपचार पूजा अभिषेक
    • तारकमंत्र जप
    • आरती – प्रार्थना – प्रसाद

नवग्रह जप- होम हवन – सर्व शांती

    • जन्मवेळी असलेले तिथी, नक्षत्र, करण, योग, प्रमाणे जननशांती.
    • कुंडली अभ्यासाप्रमाणे आवश्यक नवग्रह जप हवन
    • सप्तशती वाचन – हवन
    • नवचंडी – सहस्रचंडी
पितृपूजा - श्राध्दकर्म

आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला श्राद्धपक्ष, महालय करण्यासाठी वेळ मिळतोच अस नाही. त्यामुळे अनेकदा आपल्याकडून हि पितृकर्मे राहून जातात. खरतर वर्षातून किमान एक दिवस चार तास पितृ ऋणासाठी आपण देणं आवश्यक आहेच. पण तरीही अजिबातच काहीही न करण्यापेक्षा किमान पितृकर्म काय करता येईल ते येथे सुचवले आहे. आपल्या होणारे अनेक प्रकारचे त्रास, अडचणी केवळ पितृकर्माद्वारे दूर करू शकतो. वंश वृद्धीसाठी पिंडपूजा सांगितलेली आहे. आपल्या उपलब्ध वेळेनुसार आणि जागेनुसार करण्याचे काही पितृकर्म.

    • तर्पण
    • हिरण्यश्राद्ध – ब्रह्मार्पण
    • वर्ष श्राद्ध
    • महालय, पक्ष
आपले कुलाचार, धार्मिक विधी उच्च विद्याविभूषित गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि विधींना आवश्यक उत्तम प्रतीच्या साहित्यासह आपला समारंभ नियोजनबद्ध करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा.

पौरोहित्य - प्रश्नोत्तरे

Frequently Asked Questions
१. आपली सेवा कोणत्या शहरात उपलब्ध आहे ?

संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर अखंड भारतात आपण सेवा पुरवू शकतो.

२. सर्व विधी आपण करता का ?

सर्व शुभ कर्म आपण करतो. सोळा संस्कार, सर्व होम हवन विधी, सर्व पूजा आपण करतो.

३. परदेशात राहणाऱ्या भारतीय कुटुंबाना सेवा पुरवू शकता का ?

नक्कीच आपण online पूजा सांगतो. प्रत्यक्ष आलो आहोत याप्रमाणे पूजा कथा आरती होते. त्यासाठी पूजे आधी आपण तयारीसाठी online सेशन घेतो. आपले अनेक समाधानी यजमान कॅनडा, अमेरिका, दुबई, नेदरलँड येथे आहेत.  

४. पूजा विधींची काहीच माहिती नाही तर काय करणार ?

आम्ही आहोत ना !

आपल्याला सर्व कार्यक्रमाची, विधींची पूर्ण माहिती देऊन, सर्व शंकांचे निरसन करून सुटसुटीत आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आम्ही करून देतो.

५. चांगले गुरुजी मिळणे आणि साहित्य जमवणे खूप कष्टाचे वाटते ?

आम्ही उच्चविद्या विभूषित गुरुजींसह धर्मिक कार्य करतो. याजामानांच्या इच्छेनुसार उत्तम प्रतीचे साहित्यसुद्धा उपलब्ध करतो.

६. दरवर्षी यज्ञ करावा वाटते पण जागा आणि वेळ नाही.

ज्यांना यज्ञ होम हवन असे धार्मिक कार्य करण्याची मनापासून इच्छा आहे पण जागा आणि वेळ नाही अशा सर्वांसाठी आपण धार्मिक पर्यटनाची संकल्पना अनेक वर्षं यशस्वीरीत्या राबवतो. योग्य मुहूर्त काढून त्यादिवशी आपल्या नातेवाईक आणि पाहुण्यांसह आपले धार्मिक कार्यक्रम होतात संध्याकाळी कोकण पर्यटनसुद्धा होते. 

आपल्या येथे अत्यंत पवित्र आणि नयनरम्य परिसर असणारी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज मंदिरे आहेत. 

७. धार्मिक कार्याच्या खर्चाचा अंदाज कसा करणार ?

आपण धार्मिक कार्यक्रमात आवश्यक साहित्याची अचूक यादी देतो. गुरुजींची दक्षिणा प्रवास खर्च य बद्दल स्पष्टपणे आपल्याशी चर्चा करतो. कोणतीही संदिग्धता राहत नाही. आपल्या बजेट प्रमाणे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आखून देतो.