वास्तुशास्त्र
वास्तोस्पते नमस्तेस्तु भुशय्याभिरत प्रभो I
मद्गृहं धनधान्यादि समृद्धं कुरु सर्वदा II
वास्तूशास्त्राचे अभ्यासक आणि अचूक परीक्षणासाठी विविध ठिकाणच्या माती व जमिनी आणि बांधकामे यांचा अनुभव असणारे अग्रगण्य पेंडसे गुरुजी.
आपल्या मनामध्ये वास्तू शास्त्राविषयी अनेक प्रश्न शंका असतात. बऱ्याचवेळा अपुरी माहिती मिळाल्यामुळे मनात भीतीसुद्धा निर्माण होते. वास्तुशास्त्र हे आपल्या सर्वांच्या मदतीसाठी आहे आपल जीवन सुखकारक व्हाव म्हणून आहे. आणखी एक महत्वाची गोस्थ आपल्या मनात घर करून बसते ती म्हणजे वास्तुशास्त्र खूप महाग आहे आणि आपल्याला परवडणारे नाही; वास्तू सल्लागार खूप पैसे घेतात; रेमेडी खूप महाग सांगतात आणि तोडफोड करायला सांगतात; आपल्याला वाटत असतं पण आम्ही सुवर्णमध्य साधून मार्गदर्शन करतो.
आम्ही या विषयी उत्तम मार्गदर्शन करतो आणि तेही आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा हा निर्मल उद्देश आपला असतो.
वास्तुशास्त्राची मूळ संकल्पना
निसर्गाशी साधर्म्य साधणे व निसर्गशक्तीचा उपयोग आपल्या सुखशांती व प्रगतीसाठी करून घेणे.
- वास्तुशास्त्राचा अभ्यास अष्टदिशा व पंचमहाभूतांवर आधरित आहे. त्याप्रमाणे परिक्षण केले जाते.
- प्लॉट परिक्षण – घर – कारखाना – दुकान यासाठी उपयुक्त असल्याचे तपासले जाते.
- वास्तुशास्त्र – ऑफिस / संस्था / हॉस्पिटलचे / दुकानाचे
- वास्तुशास्त्र व शैक्षणिक / आर्थिक प्रगती
- वास्तुशास्त्र व सुखी कुटुंब
- वास्तुशास्त्र व व्यक्तिमत्व विकास अध्यात्मिक प्रगती
- वास्तुदोष निराकरण –
- सोपे उपाय
- विना तोडफोड रेमेडिज
- परिपूर्ण वास्तुपरिक्षणाचा डिटेल रिपोर्ट
सर्वांसाठी वास्तुशास्त्र तेही आपल्या बजेट प्रमाणे
- flat बुक करण्यापूर्वी किंवा घर बांधण्यापूर्वी प्लॉट परीक्षण करून घराचा प्लॅन तयार करणे म्हणजे सुख समृद्धीची गुरुकिल्ली..
- भूमिदोष निदान चिकित्सा हा वास्तुशास्त्र या महत्त्वाच्या शास्त्राचा एक मुख्य भाग आहे. ज्या भूमीवर घर बांधावयाचे आहे त्या जागेचे सर्वसामान्य पद्धतीने अवलोकन करणे म्हणजे वास्तुशास्त्रीय निरीक्षण नव्हे. जमिनीचे गुण-दोष, जमिनीची नैसर्गिक ऊर्जा, त्या जमिनीवर घडलेल्या बऱ्या-वाईट घटना व आजूबाजूचा परिसर यांची पूर्णपणे पूर्वकल्पना मिळणे अतिशय आवश्यक असते.
वास्तुशास्त्र - प्रश्नोत्तरे
Frequently Asked Questions
१. वास्तु परीक्षण करणे खूप महाग आहे का ?
अजिबात नाही. आम्ही तुमच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे काम करून मानधन स्वीकारतो.
२. रेमेडी करण्यासाठी तोडफोड करणे आवश्यक आहे का ?
आपण सोपे कमी खर्चिक आणि विना तोडफोड उपाय सुचवतो.
३. सदोष वास्तूचा परिणाम मानवी जीवनावर होतो का ?
नक्कीच होतो. सकारात्मक व नकारात्मक उर्जा (POSITIVE - NEGATIVE ENERGY) याचा परिणाम होतो. त्याप्रमाणे पंचमहाभूतांचा समन्वय वास्तूच्या व मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी आवश्यक असतो.
४. ऑफिस किंवा कारखाना येथेसुद्धा वस्तू परीक्षण आवश्यक आहे का ?
आपल्या व्यवसायाच्या व कामाच्या प्रत्येक ठिकाणाचे वास्तू परीक्षण आवश्यक आहे. तिथे किती प्रमाणात कोणती उर्जा आहे त्याचा अभ्यास करून आपली व स्टाफची बसायची जागा निवडणे गरजेचे आहे.


