कुंडली ज्योतिष

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय: |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ||

मानवी जीवनात अडचणी फक्त व्यक्ती, परिस्थिती आणि निसर्ग याच तीन गोष्टींमुळे येतात. आपले संचित, प्रारब्ध आणि कर्तुत्व यांचा अंदाज आला कि जीवन सुखकारक होण्यास मदत होते.

ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात आणि मानसिक कोंडी होते तेव्हा आपली पत्रिकेचा अभ्यास आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतो. घडणाऱ्या घटनांचा निश्चित कालावधी सांगून त्यासाठी मानसिक व कौटुंबिक तयारी करून घेणे तसेच कधी थांबायचे व कोणता निर्णय कधी घ्यायचा यामध्ये विशेष प्राविण्य आहे.

जातकाची अत्यावश्यक गरज आणि परिस्थिती ओळखून आपुलकीच्या नात्याने मार्गदर्शन केले जाते.
कुंडलीच्या सखोल अभ्यासातून अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना मदत करून समाधान मिळावे व ते सुखी होवोत हा उद्देश आहे.
विवाह गुणमेलन - विवाह मुहुर्त

विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या वधू-वरांचे त्यांच्या जन्म कुंडली प्रमाणे स्वभाव विशेष जाणून गुणमेलन पाहणे व वैवाहिक जीवनाविषयी कुटुंबीयांना आश्वस्त करणे महत्त्वाचे असते.
त्याचप्रमाणे विवाह साठी योग्य मुहूर्त काढून घेणे आवश्यक असते

  • प्रेम विवाह विषयी पालकांना भेडसावणाऱ्या अडचणी, तरुणांचे भावविश्व, नाजुक प्रश्नांची हळुवारपणे संवादातून हाताळणी व मार्गदर्शन
  • विवाह, मनोमीलन करण्यासाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास
  • संतती प्राप्तीसाठी विशेष अभ्यास पूर्ण मार्गदर्शन
  • कौटुंबिक आर्थिक स्थिरता प्राप्तीसाठी उपासना मार्गदर्शन
  • कर्ज – उधार वसूल यातून बाहेर येण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास
  • शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी योग्य सल्ला
  • नोकरी किंवा व्यवसाय निवड मार्गदर्शन
  • विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी
  • प्रत्येकाच्या आयुष्यात साडेसाती येते. हा काळ आपण वेळेवर ओळखू शकलो आणि योग्य उपासना केली तर साडेसातीच्या काळात होणारा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
  • साडेसाती काळामध्ये फक्त अडचणीच येतात असं नाही तर प्रचंड यश सुद्धा मिळतं.
  • साडेसाती आणि महादशा अंतर्दशा याचा अभ्यास करून आपण योग्य उपासना सुचवतो.

कुंडलीतील ग्रहस्थितीचा आणि वर्तमान काळात सुरू असलेल्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून आपल्या प्रश्नाचं समाधान करू शकतो.

कुंडलीचा अभ्यास करून जे निष्कर्ष निघतात त्यासाठी स्वतः करण्यासाठी उपासना आपण देतो.
मोठा खर्च करूनच आपण एका दिवसात सर्व ग्रह अनकुल करू शकतो असा समज लोकांमध्ये असतो, परंतु १००% रिझल्ट मिळण्यासाठी आपण स्वतःची ऊर्जा वाढविल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही श्रद्धापूर्वक उपासनेतून समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.

प्रत्येक व्यक्तीची जन्म कुंडली असणे आवश्यक असते. जन्मकुंडली तयार करून व्यक्तीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा अभ्यास करून यश – अपयश,सुख-दुःख शिक्षण, करिअर, विवाह इत्यादी सर्व महत्त्वाच्या टप्प्यांचा कालखंड आणि यामध्ये मनासारखे यश मिळण्यासाठी आवश्यक उपासना अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या अभ्यासातून आपण देतो.

बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्त करता येईलच असे नाही.
त्यामुळे आपण शास्त्रोक्त उपदेश आणि व्यवहारिक जीवन यांचा मेळ घालून योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो

कुंडली ज्योतिष - प्रश्नोत्तरे

Frequently Asked Questions
१. पत्रिका काढलेली नाही किंवा उपलब्ध नाही तर काय करायचे ?

आपली जन्म तारीख आणि अचूक जन्मवेळ द्यावी त्यावरून पत्रिका बनवून अभ्यास करता येतो.

२. प्रत्यक्ष यावे लागते का ?

अजिबात नाही. आपण मला आवश्यक माहिती पुरवावी आपले प्रश्न लिहून पाठवावे, त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आवश्यकता वाटल्यास आपण online meetting बुक करू शकता.

३. सुख-दुःखाचा कालावधी कळू शकतो का ?

नक्कीच आम्ही आपल्याला कधी काम होईल किंवा कधी प्रयत्न करावे केव्हा यश मिळेल किंवा वाट पहावी या सारखे प्रश्नांचे कालावधी अभ्यासपूर्वक सांगतो.

४. ग्रहांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो का ?

हो तर नक्कीच होतो. जसे चंद्रावर समुद्राची भरती ओहोटी अवलंबून असते त्याच प्रमाणे आपल्यावरसुद्धा ग्रहांच्या व पृथ्वीच्या परीवलनाचा आणि परीभ्रमणाचा परिणाम होतो.