टेलीपथी

TELEPATHIC COMMUNICATION
"शब्दांविना संवाद"

“संवाद” म्हटलं कि शब्द, वाक्य, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार आणि भरपूर काही आठवते, शब्द वापरायचे नसल्यास डोळ्यांची भाषा आणि चिन्ह भाषा (साइन लँगवेज) वापरतात आणि मूक अभिनय हा प्रकार तर सर्वविदित आहेच पण डोळे, चिन्ह, अभिनय काहीच न वापरता संवाद साधायचा असेल तर जमेल का? ज्या व्यक्ती बरोबर संवाद साधायचा आहे ती व्यक्ती समोर नसेल आणि त्या व्यक्तीचे चित्र/ चेहेरा मोहोरा आपल्याला माहिती नसेल तर संवाद साधणे शक्य आहे का? आणि ती व्यक्ती नसून प्राणी – पक्षी – झाड असेल तर अश्या संवादाचा निव्वळ विचार सुद्धा कल्पनेच्या पलीकडे वाटतो. पंच इंद्रिय असलेली आपण सर्व माणसे, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ यांचा वापर करून शब्दांविना संवाद साधू शकतो का?

खरंच हे जमेल का?
हो तर, जमेल ना !!

जसे आईला न सांगता बाळाच्या मनाची भाषा समजते आणि तसे नक्कीच शक्य आहे हे आपल्याला माहिती आहेच. प्रेमात ही न-सांगता एकमेकांपासून लांब असून ही मनातले सगळे समजते हे कधीनकधी आपण सर्वानी अनुभवले असेल आणि तसेच काही अनुभव माझ्या वाट्याला ही आलेत, ते आज तुमच्यासमोर मांडणार आहे, शीर्षक तेच “शब्दांविना संवाद” फक्त माणसांबरोबर नव्हे तर प्राणी – पक्षी आणि झाडांबरोबर सुद्धा, जन्मापासून सोबत बाळगत असेलेले पाच इंद्रिय खूप प्रगल्भ आहेत याची प्रचिती मला आली तशी वाचकांना ही येईल.

आपल्याला बऱ्याच वेळेला नकारात्मक भावना, विचार मनातून जाणवतात, कुणाचे आजारपण, कुणाचा अपघात, अचानक घरी येणारे पाहुणे (हा प्रकार आता मोबाईलच्या जमान्यात दुर्मिळ झाला आहे), घरातील सदस्यांना नेमका पदार्थ खावासा वाटणे वैगेरे वैगेरे आणि बहुतेक असे अनुभव बायकांच्या वाट्याला येतात. बायका भावनापूर्ण असतात म्हणून असेलही कदाचित पण लहानपणापासून एक वाक्य प्रयोग घरातील आजी, आई, आत्या, काकू यांच्या तोंडी बरेचदा असे “मला वाटत होते कि आज तुम्ही येणार… किंवा मला वाटत होते कि आज वाईट बातमी मिळणार”!! हे कसे होते त्याची वैज्ञानिक कारणे नक्कीच असतील पण मी त्या वाटण्याच्या मागील कारणे शोधावयास गेलो नाही पण यासारखे अनुभव घेत मोठा झालो. बऱ्याच वेळा काही अघटित घडेलसे वाटत असताना अपराधी वाटत असे. पण त्याला आता मी बालिशपणा म्हणेन कारण मला विचार आला म्हणून काही घडत असेल याची शक्यता शून्य आहे, नाही का? सतत खूप तार्किक पद्धतीने विचार करणे, प्रत्येक गोष्ट तावूनसुलाखून मान्य कारणे, प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण शोधून समाधान करणे असे आयुष्य जगात असताना एकामागे एक असे अनुभव येत गेले कि तर्कवितर्क करण्यापलीकडे ही काही जग आहे हे समजले, अनुभव मिळाले आणि त्यामागचे कारण न शोधता शांत चित्ताने तो अनुभव जगलो आणि मानसिक दृष्ट्या स्थिर होत गेले जे तर्क वितर्क करत जगात असताना क्वचितक अनुभवले होते.

टेलिपॅथीक कम्युनिकेटर

टेलिपॅथीक कम्युनिकेटर म्हणजे कुठल्याही प्राण्यांसोबत लांब असूनही संवाद साधायची कला मला जमली.

“टेलिपॅथीक कॅम्म्युनिकेशन” चा उपयोग पाळीव प्राणी असलेल्या लोकांना खूपच होतो कारण बऱ्याच वेळा त्यांच्या प्राण्याच्या मनातले समजून घ्यायची इच्छा असूनही ते जमत नाही आणि यामुळे जीवाची घालमेल होते ते अनुभवल्या शिवाय कळायचे नाही. कधी कधी पाळीव प्राणी घरातून बाहेर जातात आणि परत येत नाही त्यावेळेला हा शब्दांविना संवाद साधल्याने त्यांची खबरबात कळते, कुठे शोधायचे ते ही समजते कारण त्यांना घरी परत यायचे असेल तर ते त्यांची लोकेशन सांगतात/ दाखवतात. कधी कधी त्यांच्या तब्येतीबद्दलचे प्रश्न ही या संवादामुळे सोडवता येतात, जेवण-खाणे आवडी निवडी, त्यांच्या डोळ्यातील भाव-बोली सगळे जाणून घेणे या कलेमुळे शक्य होते.

आता हे कसे जमते तर ही कला आपण सगळ्यांकडे सुप्तावस्थेत आहे फक्त आपण तर्क-वितर्क-कुतर्क या चक्रात अडकले असतो आणि म्हणूनच ही सुप्त अवस्थेत असलेली कला वापरता येत नाही. आपल्या पंचेंद्रिय या संवादात मदत करतात, त्या प्राण्याला प्रश्न विचारला कि त्याचे उत्तर आपल्या अनुभवास येते आणि ते बरोबर असते. या अभिनव कलेचा संबंध आपल्या अंतर्मनात दडलेला आहे आणि पंचेंद्रिये साथ देतात आणि असे आगळे-वेगळे अनुभव गाठीशी येतात.

एका मैत्रिणीच्या घरी तुळस जगत नसे तर तिने शंका विचारली जी मी त्या झाडास विचारली आणि झाडाने मला घरातील त्याच्या आवडीची जागा सांगितली. मैत्रिणीने ती कुंडी सांगितलेल्या जागेवर नेऊन ठेवली आणि आता तुळस बहरली आहे. अजब दुनिया आहे, अनुभव समृद्ध करणारी कला आहे, निसर्गाच्या जवळ नेणारा संवाद आहे हा “शब्दांविना संवाद”!!

टेलीपथी - प्रश्नोत्तरे

Frequently Asked Questions
१. टेलीपथीक कम्युनिकेशन म्हणजे काय ?

निसर्गातील प्रत्येक घटकाशी संवाद साधण्याचे शास्त्र म्हणजेच शब्दाविना संवाद साधण्याची कला यालाच टेलीपथी कम्युनिकेशन  म्हणतात

२. टेलीपथीच्या सहाय्याने कोणाकोणाशी संवाद साधता येतो ?

सजीव, निर्जीव आणि निसर्ग या सर्वांशी संवाद साधण्यासाठीच टेलीपथी शास्त्राचा उपयोग केला जातो.

३. टेलीपथीचा उपयोग नेमका कसा करून घेता येईल ?

टेलीपथीच्या सहाय्याने आपण व्यक्तीच्या मनातले विचार ओळखू शकतो, आपल्या पाळीव प्राण्यांच्या भावना समजू शकतो. घर, वास्तू, बाग अशा आपल्या आवडत्या ठिकाणांशी सुद्धा संवाद साधता येतो.

४. टेलीपथीचे मार्गदर्शन घेण्यासाठी काय करावे आणि खर्च किती ?

आपण आपली फोन करण्याची वेळ ठरवून घ्यावी आपल्याला किती प्रश्न विचारायचे आहेत किंवा फोनसाठी किती वेळ आपण बुक करता यावर फी अवलंबून आहे. नक्कीच फार खर्चिक नाही.