अध्यात्मिक व्याख्याता

ऋतं च स्वाध्यायप्रवचने च । सत्यं च स्वाध्यायप्रवचने च । तपश्च स्वाध्यायप्रवचने च ।
- तैत्तिरियोपनिषद

भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय संस्कृती, वेद वेदांग उपनिषद यांचा अभ्यास समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच भगवद्गीता, रामायण, महाभारत यासारखे आपल्याला मार्गदर्शक ठठरणाऱ्या आपल्या धर्मग्रंथातील अलौकिक विचार आणि अप्राप्य वाटणारे ज्ञान सोप्या भाषेमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे म्हणून प्रयत्नशील आहे. 

भारतामध्ये जन्मलेले कर्तुत्ववान महापुरुष हे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कथा ऐकूनच घडले.  

आपल्या आराध्य देवता समजून घ्याव्यात म्हणून आम्ही आग्रही आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान रोजच्या जीवनामध्ये आपण कशाप्रकारे उतरवू शकतो याचाही विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. जीवनमूल्यांच्या या सर्व कथा ऐकायला मिळाव्यात यासाठी पेंडसे गुरुजी प्रयत्नशील आहेत.

समाजातील ज्ञानाची पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे |
शहाणे करून सोडावे सकलजन ||

अशा जबाबदारीच्या भावनेतून व्यवसाय म्हणून नाही तर धर्मकार्य म्हणून व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन पेंडसे गुरुजी आणि सहकाऱ्यांकडून वारंवार केले जाते.

आपल्याला धर्माचे ज्ञान व्हावे हिंदू धर्माविषयी गौरव भावना मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी अशा कथांचे तसेच व्याख्यानांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. आपल्या वार्षिक उत्सवांमध्ये, मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये तसेच आपल्या सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनांमध्ये अशा प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन आपण केले पाहिजे. हिंदू धर्माचे आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेचे   संरक्षण आणि संवर्धन ही आपलीच जबाबदारी आहे. 

व्याख्याने

श्रीराम कथा

श्रीराम कथा संपूर्ण सामाजिक जीवन उजळून टाकण्याकरिता ज्या दिव्य गाथेची, ज्या दिव्य कथेची, ज्या दिव्य आदर्शाची आज आवश्यकता आहे, ती रामकथा आहे. याविषयी आपण जेवढा ...

श्रीदत्त दर्शन

श्रीदत्त दर्शन श्रीदत्तगुरु समजून घेण्यासाठी मूर्ती, चरित्र आणि तत्वज्ञान याविषयी बोलले पाहिजे. दत्तमहात्म्य, दत्त संवाद, श्रीदत्तात्रेय विषयक उपनिषदे याविषयी बोलणारे खूप कमी साधक आहेत. दत्त ...

गणेश दर्शन

गणेश दर्शन   आपला गणपती बाप्पा समजून घेण्याची आवश्यकता आहे. गणपतीची स्तोत्र म्हणताना मंत्राचा अर्थ समजत जातो. परंतु काही शब्द असे असतात, की त्यांचा अर्थ ...

उपनिषदे

उपनिषदे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, माण्डुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छान्दोग्य, बृहदारण्यक ही दहा उपनिषदे प्रमुख आहेत. वेदांचे संहिता, ब्राह्मण आरण्यक आणि उपनिषद् असे चार भाग ...

अध्यात्मिक व्याख्याता - प्रश्नोत्तरे

Frequently Asked Questions
१. व्याख्यान आयोजित करण्यासाठी सुविधा काय अपेक्षित असतात ?

विशेष सुविधा काही नाही. ध्वनी आणि वीज व्यवस्था, श्रोत्यांना आवश्यक बैठक व्यवस्था.

२. व्याख्यानासाठी मानधन किती घेता ?

भारतीय ज्ञान परंपरेच्या प्रचार आणि प्रसाराचे व्रत घेतले आहे अर्थार्जन हे ध्येय नाही.

३. किती दिवस आधी संपर्क करणे आवश्यक आहे ?

      एक महिना आधी संपर्क करून निश्चिती करावी.